Skip to main content

Posts

महाराजांचे मनोगत

🚩🚩महाराजांचे मनोगत🚩🚩 या महाराष्ट्रात आता जीव रमत नाही। माझ्या मुलखताच मला आता मावळा भेटत नाही।। दर जयंतीला नवी संघटना उगवते। यांच्या हट्टासाठी मला वर्षातून तीनदा जन्मवे लागते। एवढे करूनही माझी विटंबना काही टळत नाही। या महाराष्ट्रात.... माझे बाजी, तानाजी स्वराज्यासाठी लढले। आताचे बाजी, तानाजी खुर्चीसाठी लढतात। सत्तेसाठी काहीही, हा मंत्र जो तो पाळी। या महाराष्ट्रात ... हे राज्य व्हावे ही तो श्रींचीच इच्छा होती। स्वराज्यासाठी प्राण देण्याची शर्यतच जणू होती। स्वराज्यापुढे मावळ्यांना माझ्या घरदारही दिसले नाही। या महाराष्ट्रात ... सला काय निमित्ते केला? या एका बोलासाठी सरनोबत खर्ची पडले। संताजी धनाजीला मुघल पाण्यातही पाही। या महाराष्ट्रात ... मुघल मनसब, आदिली वतने। मावळ्यांना माझ्या कशाचीच अपूर्वाई नव्हती। लढले सगळे घडविण्या समर्थ शिवशाही। या महाराष्ट्रात ... रोजच होतो आता माझ्या नावाचा जयघोष। डॉल्बीच्या भिंतींपुढे चाले धुडगूस। माझ्या बसल्या तरी, यांच्या कानठाळ्या बसत नाही। या महाराष्ट्रात ... वाटते आता सुखे कैलासातच राहावे। रोजच आपुले मरण किती वेळा प
Recent posts

शिवछत्रपती - प्रतिमा आणि वास्तव

        विष्णुगुप्त अर्थात आर्य चाणक्य। इतिहासकाळात ई. स. पूर्व ४थया शतकात भारतात जन्मलेला पहिला राष्ट्रवादी पुरुष। त्यानंतर सुमारे २००० वर्षांचा एक प्रदीर्घ शून्य काळ। दरम्यानच्या काळात थोर सम्राट, राजे, महाराजे, पराक्रमी पुरुष, अनेक थोर योद्धे या राष्ट्रात होऊन गेले। मात्र भरताकडे राष्ट्र या नजरेतून पाहणारा कोणी नाही।  ई. स. १६३० मध्य हा प्रदीर्घ शून्य काळ संपला। भारताचा भाग्यविधाता शिवनेरीवर जन्मास आला। मी इथे महाराष्ट्राचा म्हणत नाहीये हे कृपया लक्षात घ्यावे। त्यांना अज्ञानाने आम्ही महाराष्ट्राच्या सीमांमध्ये बंदिस्त केलंय।             राजांच्या कर्तृत्वाचा विचार करताना आपण नेहमी त्यांच्या समारांगणातील पराक्रमावर विशेष भर देतो। राजे आम्हाला नेहमीच शत्रूची बोटे छाटताना किंवा त्याचा कोथळा फाडताना पाहायला आवडतात।मात्र त्यांच्या अफाट, अचाट आणि अथांग व्यक्तिमतवाचा तो फक्त एक पैलू आहे। वैयक्तिक पराक्रम पाहता असे पराक्रमी वीर थोड्याफार फरकाने सर्वत्र झालेले दिसतात। मात्र असे असूनही त्यांच्या पराक्रमाचे गोडवे राजांसारखे व राजांप्रमाणे सर्व स्तरावर गायले जात नाहीत। काय कारण असावे याचे? य